breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शाळेतील 20 विद्यार्थी ठरले लाखाचे मानकरी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांचा १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ९४.११ टक्के इतका लागला. यंदा महापालिकेच्या शाळेतील २० मुले लाखांचे मानकरी ठरले आहेत. तसेच ९९ विद्यार्थ्यांना ५० हजारांचे तर १३५ विद्यार्थ्यांना २५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे.

शहरात महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या अठरा शाळा आहेत. शाळांमधील जे विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवितात त्यांना महापालिकेतर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते.

८५ ते ८९ टक्क्यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार तर ८० ते ८४ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येते. यंदा दहावीच्या परीक्षेस २०३१ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १८९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा २० मुलांना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button