breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची नियमावली जाहीर; पाहुया काय सुरू? काय बंद? राहणार

केंद्र सरकारनंतर महाराष्ट्र सरकारनंही अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची नियमावली जाहीर केली आहे. त्यात पूर्वीपेक्षा काही अधिकच्या सवलती देण्यात आल्या आहेत.अनलॉकचा तिसरा टप्पा जाहीर करताना केंद्र सरकारनं जीम आणि व्यायामशाळा खुल्या करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी राज्यातील परिस्थिती पाहून महाराष्ट्रात तरी इनडोअर जीम आणि व्यायामशाळा बंदच राहणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने बुधवारी ‘अनलॉक तीन’बाबत नवीन गाइडलाइन्स जारी केल्या. या गाइडलाइन्स विचारात घेऊन राज्य सरकारनंही मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन राहणार असून कंटेनमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू असणार आहेत. मात्र, इतर ठिकाणी काही अधिकच्या सवलती देण्यात आल्या आहेत.

केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये जीम व व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं राज्यातही त्या सुरू राहणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, राज्य सरकारनं याबाबत तातडीनं खुलासा केला आहे. राज्यात केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून ५ ऑगस्टपासून परवानगी असेल. इनडोअर जीम, व्यायामशाळा बंदच राहतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात काय सुरू? काय बंद? राहणार पाहुयात…

  • अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सुरू राहणार
  • मार्केट, आणि इतर दुकाने सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू राहणार
  • मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकाने उघडण्यास परवानगी
  • ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू राहणार.
  • मॉलमधील फूड कोर्ट, सिनेमागृहावर बंदी कायम. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट व रेस्टॉरंट्सना किचन सुरू ठेवण्यास मुभा
  • बांधकाम व्यावसायिकांना काम सुरू ठेवण्यास परवानगी, मान्सूनपूर्व कामे रखडली असल्यास काम सुरू करता येणार
  • रेस्टॉरंट व मोठ्या हॉटेलना होम डिलिव्हरीसाठी परवानगी
  • ऑनलाइन- डिस्टन्स लर्निंग अॅक्टिव्हिटी सुरू ठेवता येणार
  • खासगी कार्यालये कर्मचाऱ्यांच्या १० टक्के व १० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करता येणार
  • सरकारी कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार
  • स्विमिंग पूलवर बंदी कायम
  • ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून शिक्षण सुरू राहणार
  • केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा सुरू राहणार
  • अत्यावश्यक सेवा आणि कार्यालयीन कामासाठी जिल्हांतर्गंत प्रवास करता येणार.
  • लग्न समारंभसाठी सरकारनं २३ जूनला जारी केलेले आदेश कायम असणार आहेत.
  • वृत्तपत्र प्रिटिंग आणि वितरणाला परवानगी आहे
  • खासगी वाहनांचा वापरही फक्त अत्यावश्यक असल्यास करण्याच्या सूचना
  • दुचाकीवरून प्रवास करताना हेम्लेट बंधनकारक असणार आहे. तसंच, चारचाकी वाहनामध्ये फक्त ३ माणसांना परवानगी देण्यात आली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button