breaking-newsताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसचा सेनेला धोका; सिन्नरचे ५ नगरसेवक फोडले

नाशिक – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा शिवसेनेला धोका दिला आहे. आघाडी धर्माला काळिमा फासत राष्ट्रवादी काँग्रेसने सिन्नरचे शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून उपनगराध्यक्षपद मिळविले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने पारनेरमध्येही शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले होते. शेवटी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढावी लागली होती. आता पुन्हा राष्ट्रवादीने आपला रंग दाखविला आहे.

बुधवारी सिन्नर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार प्रणाली गोळेसर यांच्याविरोधात उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी बाळासाहेब उगले यांच्यासाठी शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले आणि स्वतःच्या १० नगरसेवकांची मतेही बाळासाहेब उगले यांच्या पारड्यात टाकली व त्यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले. बाळासाहेब उगले यांना १५ मते मिळाली तर शिवसेनेच्या उमेदवार प्रणाली गोळेसर यांना १४ मते मिळाली. माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेला धक्का देत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना फोडून बाळासाहेब उगले यांना मतदान करायला लावले. त्यामुळे बहुमतात असलेल्या सिन्नरच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

विशेष म्हणजे सिन्नर नगर परिषदेत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. फक्त आमदार माणिकराव कोकाटे यांना मानणारे १० अपक्ष नगरसेवक आहेत.
सिन्नर नगर परिषदेत शिवसेनेचे पूर्णपणे बहुमत आहे. सिन्नर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि माणिकराव ठाकरे यांचे राजकीय वैर फार जुने आहे. आता महाराष्ट्रात सत्तेत असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आघाडी धर्मात बांधले गेलेले आहेत. मात्र तरीही माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेचे ५ नगरसेवक फोडून आपल्या १० नगरसेवकांच्या सहाय्याने सिन्नरचे उपनगराध्यक्षपदी मिळविले आहे. याचे आता महाविकास आघाडीवर फार मोठे परिणाम होणार आहेत. आता राष्ट्रवादीने कारण दिले आहे की, प्रणाली गोळेसर या शिवसेनेच्या नगरसेविका नाहीत. त्या अपक्ष नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही बाळासाहेब उगले यांना पाठिंबा देत उपनगराध्यक्षपदी निवडून आणले. हा युक्तिवाद शिवसेनेच्या किती पचनी पडतो हे लवकरच कळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button