breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शाळांमध्ये निकृष्ट माध्यान्ह भोजन देणा-या ठेकेदाराचा ठेका रद्द करा

रयत विद्यार्थी विचार मंचतर्फे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी| 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शालेय पुरक पोषण आहारातून निकृष्ट दर्जाचे आहार देणा-या ठेकेदारांचा ठेका रद्द करुन त्याला काळ्या यादीत टाका, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचने केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र देवून सखोल चाैकशीची मागणी केली आहे. त्यात पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक, हिंदी ,इंग्रजी ,उर्दू ,मराठी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये मिड – डे मिल, शालेय पोषण आहार दिला जातो. सदरील आहार हा विविध संस्था, बचत गटामार्फत तयार केला जातो.

त्या मिड-डे मिल ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांना दिलेला शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जेचा व अयोग्य आहे. याबाबत अनेक तक्रारी वारंवार विद्यार्थी आणि पालक करीत आहेत. त्याकडे शाळांचे मुख्याध्यापक व व्यवस्थापन कमिटीने देखील दुर्लक्ष केले आहे. सदर पोषण आहार पोषक नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी धोका निर्माण करणारा आहे. त्या खिचडीच्या आहारात योग्य प्रतिचे धान्य, तांदूळ वापरले जात नाही, स्वच्छ व योग्य प्रकारे साफसफाई होत नाही. खिचडी खाण्यायोग्य नसून त्यात खडे आढळत आहेत. अनेकवेळा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या वेगवेगळ्या शाळांना दररोज भेट देऊन विद्यार्थ्यांसमवेत मिड -डे मिल मध्ये सहभागी व्हावं, यामुळे आहाराचा दर्जा सुधारण्यात मदत होईल. तसेच योग्य प्रकारे आहार न तयार करणाऱ्या संस्था, बचत गटांची सखोल चाैकशी करुन कारवाई करण्यात यावी, दोषी आढळणा-या संस्था, बचतगटाचे ठेका रद्द करावा, अशी मागणी रयत विचार मंचचे अध्यक्ष धम्मराज साळवे, संतोष शिंदे, अंजना गायकवाड, रोहित कांबळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button