breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

बिहार, कर्नाटकनंतर भाजपच्या रडारवर महाविकास आघाडी ?

महाईन्यूज | मुंबई |

कर्नाटकमध्ये नुकत्याच 15 जागांवर झालेल्या पोट निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चांना चांगलेच उधाण आलेले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या कारभारापेक्षा ते कोसळण्याच्या चर्चांच अधिक असल्याचे दिसून येत आहे. तसा प्लॅनच भाजपने सुरू केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा गोड बातमीचा उल्लेख केल्यामुळं या शक्यतांना पाठबळ मिळतानी दिसत आहे. कर्नाटकमधील बंडखोर आमदारांवर केलेल्या कारवाईनंतर १५ विधानसभा जागांवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांत भाजपने १२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे.

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या सरकारला बहुमतासाठी सहा जागांची आवश्यकता असताना त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्याने आता हे सरकार स्थिर सरकार झाले आहे. काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या असून जनता दलाला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. कर्नाटकपूर्वी भाजपने बिहारमध्ये देखील लालू प्रसाद यादव यांच्या राजदलाला धक्का देत सत्तेतून बाहेर केले होते. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रावर भाजपाची करडी नजर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button