breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेचे अधिकारी बनले भाजपचे ‘गुलाम’ – दत्ता साने

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेत विरोधी पक्षनेता असूनही माझ्या प्रभागातील विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आपल्याला आले नाही. प्रशासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करून पालिकेचे अधिकारी सत्ताधारी भाजपचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये गुरुवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमांना स्थानिक नगरसेवक तसेच विरोधी पक्षनेता असूनही संबंधित विभागाच्या अधिका-यांनी आपल्याला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. निमंत्रण न देताच उद्‌घाटन करण्यात आले. मी स्थानिक नगरसेवक असून विरोधी पक्षनेता या पदावर कार्यरत आहे. तरी, देखील आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही. विरोधी पक्षनेत्यांनाच जर अशी वागणूक मिळत असेल. तर, विरोधी पक्षातील इतर नगरसेवकांना कशी वागणूक दिली जात असेल ? महापालिकेत शिष्टाचार (प्रोटोकॉल) नावाची गोष्ट राहिली नाही, असे साने म्हणाले.

हा प्रकार अतिशय गंभीर असून महापालिकेचे अधिकारी भाजपचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत. भूमिपूजन आणि उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांना टाळण्यात आल्याबाबत सखोल चौकशी करावी. दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते साने यांनी केली आहे. यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची ताकीद अधिकाऱ्यांना द्यावी, असेही साने यांनी आयुक्त हार्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button