breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शाळांच्या शिक्षकांसाठी राबविणार निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी 4 ते 23 डिसेंबरदरम्यान शहरात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

निष्ठाअंतर्गत महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी राज्यस्तरावर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्‌ये, समावेशित शिक्षण, अध्यापनात माहिती व तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच आरोग्य व योगा, ग्रंथालय, पर्यावरण क्‍लब, शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्‌ये, पर्यावरणविषयक जागृती, शाळापूर्व शिक्षण, आनंददायी वातावरणात शाळा आदी विविध विषयांचा निष्ठा प्रशिक्षणात समावेश करण्यात येणार आहे.

निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचा दैनंदिन तपशील, उपस्थितीपूर्व चाचणी व उत्तर चाचणी व नियोजन केंद्र शासनास सादर करावे लागणार आहे. तसे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button