breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“अनिल देशमुखांना आता करोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा करोना नव्हता का?”- अंजली दमानिया

मुंबई |

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं असताना अनिल देशमुखांनी मात्र आपण प्रत्य७ चौकशीसाठी हजर राहू शकत नाही सांगितलं आहे. आपण जबाब ऑनलाईन देण्याची आपली तयार अससल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं असून तसं पत्र ईडीला पाठवलं आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुखांनी सवलत देऊ नये अशी विनंतीच ईडीकडे केली आहे.

“अनिल देशमुखांना आता करोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता करोना?,” अशी विचारणा अंजली दमानिया यांनी ट्वीट करत केली आहे. “ईडीने बिलकुल अपवाद करू नये. सर्वांसाठी कायदा समान असला पाहिजे. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा?,” असंही त्या म्हणाल्या आहेत. “भाजपाची ही चाल आहे, पण तुमचे हातदेखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं म्हणत यावेळी त्यांनी देशमुखांसोबत भाजपावरही निशाणा साधला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button