breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागा एकाची अन्ं वृक्षतोड परवानगी दुस-यालाच, मुख्यउद्यान अधिक्षकांचा भोंगळ कारभार

शेतीच्या नावावर वृक्षतोड करुन प्लाॅटिंग धंदा, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांचे दुर्लक्ष

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

शेती विकासाच्या नावाखाली सहयोगनगर (तळवडे) परिसरातील सर्व्हे नंबर 167 याठिकाणचे क्षेत्र रेडझोन बाधित आहे. त्या जागेवर शेती करण्याच्या नावावरुन बेसुमार वृक्षतोड करुन प्लाॅटिंगचा व्यवसाय सुरु आहे. वृक्ष तोड करण्याची परवानगी देताना महापालिकेच्या मुख्य उद्यान अधिक्षकांकडे त्या जागेचा मालक एक आणि परवानगी मागणीचा अर्ज दुस-याच्याच नावाने देण्यात आली आहे. त्यामुळे वृक्ष संर्वधन हे केवळ कागदोपत्रीच राहू लागले आहे. त्याकडे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांचेही दुर्लक्ष होवू लागले आहे.

तळवडे येथील अनेक भाग रेडझोन बाधित आहे. त्या बाधित जागेवरील वृक्षतोड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वृक्ष संर्वधन समितीची परवानगी न घेताच झालेली आहे. शेती विकासाच्या नावाखाली रेडझोन जागेवरील शेकडो झाडांवर कु-हाड कोसळली आहे. प्रत्यक्षात त्या जागेचे प्लाॅटिंग करुन सर्वसामान्य नागरिकांना लाखो रुपयाला विक्री करत फसवणूक सुरु आहे.

त्या सर्व्हे नंबर 167 जागेवरील नारळ, सुपारी, देशी-विदेशी झाडे बिनबोभाट तोडण्यात आलेली आहेत. ही झाडे तोडण्यासाठी मिलींद प्रकाश दुधाने यांच्या नावाने महापालिका मुख्यउद्यान अधिक्षकांकडे अर्ज सादर करण्यात आला. त्यावरुन सुपरवायझर एस.जी.घोडे यांनी सर्व्हे केला. त्यानंतर वृक्ष संर्वधन समितीकडे शेती विकासाच्या नावावर प्रस्ताव सादर करुन वृक्षतोड करण्याचा परवानगी देण्यात आली. परंतू, मुख्य उद्यान अधिक्षकांनी आर्थिक हिंतसंबंध जोपासत आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि वृक्ष संर्वधन समिती सदस्याची दिशाभूल करुन ही परवानगी मिळविली आहे.

सर्वसामान्य नागरिकांचा फसवणूक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत, नवनगर विकास प्राधिकरण परिसरात अनेक ठिकाणी रेडझोन बाधित क्षेत्र आहे. त्या क्षेत्राचे वाजवी दरात प्लाॅटिंग करण्याचा व्यवसाय तेजीत सुरु आहे. याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण, जिल्हाधिका-यांनी स्पष्ट शब्दात सह दुय्यम निबंधक हवेली – 14 यांना निर्देश देवून रेडझोन बाधित जमिनीचे खरेदी-विक्री सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button