breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच अवस्था; आयुक्तांचे ‘कोणी ऐकतच’ नाही

  • आयुक्त श्रावण हर्डिकरांचा प्रशासनावर नाही वचक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा अधिकारी व कर्मचा-यांवर कसलेही नियंत्रण नाही. महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर केवळ कागदोपत्री पत्रकवजा आदेश दिल्याने कार्यालयीन शिस्तीच्या आदेशाचे कोणीच पालन करीत नाहीत. त्यामुळे महापालिका म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच अवस्था झालेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गतीमान आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन उपस्थितीसाठी बायोमेट्रीक थम्ब प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. पंरतु, महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन शिस्तीचे व बायोमेट्रीक थम्ब प्रणालीचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रकाद्वारे नियमावली जारी केली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी लावण्याबरोबच हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणेही बंधनकारक आहे. मात्र, काही अधिकारी, कर्मचारी बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी न लावता केवळ हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करतात. थम्ब करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. ही बाब अयोग्य आहे. एका महिन्यात तीन वेळा कार्यालयात उशिरा आल्यास संबंधितांची किरकोळ रजा खर्ची टाकावी. किरकोळ रजा शिल्लक नसल्यास अर्जीत रजा खर्ची टाकावी. ही कार्यवाही दरमहा करण्यात यावी. याबाबत जारी केलेल्या आदेशाची नोंद सेवानोंद पुस्तकात घ्यावी व रजा वजावट करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील महिन्याच्या 15 तारखेपूर्वी प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा.

तसेच ज्या महिन्यात एकही अधिकारी, कर्मचारी उशिरा आले नसल्यास तसा अहवालही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करताना दर्शनी भागावर ओळखपत्र लावावे. पदानुसार निश्‍चित केलेला गणवेश परिधान करावा. कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून इतरत्र फिरु नये. भोजनाची सुट्टी संपल्यानंतर दुपारी दोन वाजता वेळेत कार्यालयात हजर रहावे. अन्यथा अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध शाखा प्रमुखांनी शिस्त भंगाची कारवाई करावी, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button