breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! खुनातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र पोलिसांवर उत्तर प्रदेशमध्ये हल्ला

उत्तर प्रदेश |

एका हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. गाझियाबादमधील एका गावात महाराष्ट्र पोलिसाचं पथक एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीच्या गावी गेले होते. त्यावेळी जमलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी आणि इतर गावकऱ्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. पोलिसांना मारहाण करत पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. हत्येच्या घटनेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या पथकावर स्थानिकांनी हल्ला करत वाहनाची तोडफोड केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या गाडीची जमावाकडून तोडफोड करण्यात येत असल्याचे दिसत आहे. गावकऱ्यांनी लाकडांच्या सहाय्याने पोलिसांच्या गाडीवर हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाझियाबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गाझियाबाद पोलिसांनी हस्तक्षेप करत महाराष्ट्र पोलिसांना संशयित आरोपीच्या गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले. यानंतर गाझियाबाद पोलिसांना घटनास्थळावरुन सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button