breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्तांचा करवाढीचा प्रस्ताव भाजप फेटाळणार, नागरिकांना दिलासा

  • आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व प्रकारच्या करांमध्ये 5 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवलाय. परंतु, हा प्रस्ताव महासभेत फेटाळून लावण्यात येणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी काल शनिवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महापालिका अधिनियमात करयोग्य मूल्यात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. तसेच, याच अधिनियमानुसार स्थायी समितीचा प्रस्ताव विचारात घेऊन कराचे दर निश्‍चित केले आहेत. जुन्या मिळकतींचे करयोग्य मूल्याचे पुनर्मूल्यांकन करून त्यानुसार येणारे नवीन करयोग्य मूल्य ठरविण्यासाठी करयोग्यमूल्य पद्धत आणि भांडवलीमूल्य पद्धत अशा दोन पद्धतींनुसार सादरीकरण केले आहे. यापैकी उचित पद्धतीस करयोग्यमूल्य व कराच्या दरास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

मात्र, काल झालेल्या पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पत्रकार परिषदेत आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा प्रस्ताव फेटाळणार असल्याची माहिती दिली. जर हा प्रस्ताव भाजपकडून फेटाळण्यात आला तर पिंपरी-चिंचवडकरांवर तुर्तास तरी कोणतीही करवाढ होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.  


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button