breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

चांदोली धरण पाऊस : चांदोली परिसरात पावसाचा हाहाकार

वारणावती – आष्पाक आत्तार : चांदोली धरण परिसरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. गुरुवारी सकाळी आठ ते आज शुक्रवार सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासांत तब्बल 574 मिलिमीटर पाऊस येथे कोसळला आहे. चांदोली धरण उभारणी पासुनच्या इतिहासातील हा रेकॉर्डब्रेक पाऊस आहे.

मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाची पाणी पातळी 24 तासात तब्बल सव्वा पाच मीटरने तर पाणीसाठा साडेचार टीएमसी ने वाढला आहे.धरणात 66021 कयुसेक्स पाण्याची आवक होत आहे. मुसळधार पाऊस आणि धरणात होणारी पाण्याची आवक यामुळे धरणातील विसर्ग वाढवण्यात आला असून 24 हजार 720 क्युसेक्स करण्यात आला आहे.वीज निर्मिती केंद्रातून 510 कयुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दोन्ही मिळून 25 हजार 230 कयुसेक्स पाणी नदीपात्रात येत आहे.

त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर गेली असून शिराळा पश्चिम भागातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत.शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मनदूर मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.नदीकाटा सह अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.

सध्या धरणाची पाणी पातळी 625. 55 मीटर असून धरणात पाणीसाठा 32.73 टीएमसी झाला आहे. धरण 95.14 टक्के भरले आहे. वारणावती : आरळा शित्तुर पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाहुवाडी व शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button