क्रिडाताज्या घडामोडी

हैदराबादच्या संपूर्ण डावात एकटा राहुल त्रिपाठी लढला

धावबाद झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या पायऱ्यावर बसून रडला

अहमदाबाद : ज्या मैदानावर भारताचा पराभव करून पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून दिला त्याच नरेंद्र मोदी मैदानावर आयपीएलच्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत पॅटच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला. कोलकाता नाईट रायडर्सने ही लढत ८ विकेटनी जिंकली आणि अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. संपूर्ण स्पर्धेत विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचे फलंदाज अपयशी ठरले त्याच बरोबर गोलंदाजीची धार दिसली नाही.

हैदराबादच्या संपूर्ण डावात एकटा राहुल त्रिपाठी लढला. मात्र नशिबाने त्याला साथ दिली नाही. फलंदाजी करताना तो धावबाद झाला. मैदानातून बाहेर झाल्यावर राहुल ड्रेसिंग रुममध्ये गेलाच नाही. पॅव्हेलियनमध्ये जाताना तो तेथील पायऱ्यांवर बसला आणि ढसाढसा रडू लागला. त्याला स्वत: याची कल्पना होती की, आपली विकेट किती महत्त्वाची आहे आणि तो जर मैदानावर आणखी काही षटके थांबला असता तर हैदराबाद आणखी धावा करू शकला असता.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचा डाव १९.३ षटकात १५९ धावांवर संपुष्टात आला. हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली नाही. आक्रमक फलंदाज ट्रेव्हिस हेड शून्यावर बाद झाला. संघाने पॉवर प्लेमध्ये ३ विकेट गमावल्या होत्या. अभिषेक शर्मा ३, नितीश रेड्डी ९ आणि शाहबाज अहमद शून्यावर माघारी परतले. ४५ धावांवर ४ विकेट बाद अशी अवस्था असताना राहुल त्रिपाठी आणि हेन्निक क्लासेन यांनी आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी ३७ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. त्रिपाठीने २९ चेंडूत अर्धशतक केले होते. मात्र ११व्या षटकात वरुण चक्रवर्तीने ही भागिदारी मोडली. क्लासेन ३२ धावांवर बाद झाला.

त्यानंतर काहीच वेळात एक धाव घेण्याच्या प्रयत्नात झालेल्या चुकीमुळे राहुल त्रिपाठी धावबाद झाला. राहुलला स्वत:कल्पना होती की हा किती मोठा झटका आहे. राहुल हा हैदराबादचा एकमेव फलंदाज होता ज्याने केकेआरच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली होती. अशा पद्धतीने बाद झाल्याने तो निराश झाला आणि पॅव्हेलियनमध्ये जाताना पायऱ्यांवर बसला आणि रडू लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button