breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्तांचा ‘आशीर्वाद’, ठेकेदाराला दोन कोटीचे थेट पध्दतीने काम

  • ई प्रभागातील सार्वजनिक शाैचालय व मुतारी दैनंदिन साफसफाईचे काम

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी ई क्षेत्रीय कार्यालयातंर्गत सार्वजनिक शाैचालय व मुतारीची दैनंदिन साफसफाई करण्याचे काम दोन संस्थाना थेट पध्दतीने देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षासाठी तब्बल दोन कोटी तेरा लाखांचे काम दोन ठेकेदार संस्थाना देण्यात येत आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि पारदर्शकतेचा टेभा मिरवणा-या आयुक्तांसह आरोग्य कार्यकारी अधिका-यांनी निविदा न राबविता हे काम दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ई क्षेत्रिय कार्यालयातंर्गत प्रभाग क्रमांक 3,4,5 व 7 मधील सार्वजनिक शाैचालय व मुतारी यांची दैनंदिन साफसफाई करण्याचे काम काढले होते. त्यानूसार 327 सार्वजनिक शाैचालय, 49 सार्वजनिक मुतारी या दोन्हीची यांत्रिक पध्दतीने साफसफाई करण्यात येईल. या कामासाठी सफाई कामगार, वाहनचालक, साहित्य, औषधे, सुरक्षा साधनाचा खर्च आणि वाहने, जेट मशिन, इतर साहित्य देखभाल दुरुस्तीसह भाडे देण्यात येणार आहे. हे काम तीन वर्षांसाठी दिले असून त्याचा खर्च 2 कोटी 13 लाख 36 हजार 699 रुपये होणार आहे.

दरम्यान, महापालिका हद्दीतील वाल्मिकी व मेहतर समाजातील सफाई कर्मचारी कुटूंबियांच्या शासन नोंदणीकृत सहकारी संस्था यांना हे काम थेट पध्दतीने देण्यात आले आहे. यामध्ये मे. महर्षि वाल्मिकी स्वयंरोजगार सेवा संस्था मर्या आणि मे महर्षि दीन महिला आधार रोजगार संस्था या दोन्ही संस्थावर मेहरबानी दाखवण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त आणि आरोग्य कार्यकारी अधिकारी यांनी कोट्यावधी रुपयांचे काम थेट पध्दतीने देवून नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे शहरातील अन्य समाजातील दुर्लक्ष व वंचित घटकातील बेरोजगार संस्थाना देखील अशाच प्रकारची कामे देण्याची मागणी अन्य संस्थाकडून होवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button