breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकारी-कर्मचा-याचे धाबे दणाणले

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेत एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या मार्च-एप्रिलमध्ये बदल्या करण्यात येणार आहेत. या बदलीसाठी पात्र, वैयक्तिक आणि वैद्यकीय कारणास्तव ज्यांना बदली हवी, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती 18 फेब्रुवारीपर्यंत प्रशासन विभागाकडे पाठवावी, असे पत्र प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सर्व विभागप्रमुखांना पाठविले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण 2011 मध्ये तयार केले आहे. त्यानुसार एका विभागात तीन वर्ष सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीसाठी पात्र ठरतात. मात्र, बहुतांश कर्मचारी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यातील काहींना तर एकाच विभागात पंधरा-पंधरा वर्षे झाली आहेत. तरीही त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.

त्यामुळे तीनपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत राहणारे आणि बदलीस पात्र असूनही राजकीय दबाव आणणा-या अधिकारी व कर्मचा-याचे दाबे दणाणले आहेत. प्रशासन विभागाने आता बदलीस पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी कागदपत्रांसह मागवली आहे. गतवर्षी बदल्यांबाबत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बदल्या केल्या नव्हत्या. गेल्या वर्षी बदलीसाठी अर्ज केलेल्यांनी आता पुन्हा मुदतीत अर्ज करायचे आहेत.

दरम्यान, महापालिका सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदली मिळण्याबाबतचा अर्ज संबंधित विभागाकडे 18 फेब्रुवारीपर्यंत द्यायचा आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. बदली संबंधिचा अर्ज संबंधित विभागाने प्रशासनाकडे न पाठवल्यास आणि त्याबाबत तक्रार आल्यास त्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर निश्‍चित करण्यात येईल, असे उपायुक्त मनोज लोणकर यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button