breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काॅंग्रेसशी आघाडी करु पण, आपल्यासोबत राष्ट्रवादी नको – वंचित आघाडीची भूमिका

मुंबई –  विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. आता वंचितनेही काँग्रेससोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, वंचितने काँग्रेससमोर अशक्यप्राय अट ठेवली असून राष्ट्रवादी नसेल तरच आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे.

त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर वंचित या महाआघाडीत सहभागी होणार नाही. वंचितच्या या अटीमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष समावेश होण्याची शक्यता फार कमी आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी भूमिका जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं होतं. आताही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध कायम आहे. त्यामुळेच वंचितने जर राष्ट्रवादी सोबत नसेल तरच काँग्रेसशी आघाडी करण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत आघाडी झाल्यास 50 टक्के जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची भूमिकाही वंचितने घेतली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला 30 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. आघाडीचा निर्णय न झाल्यास नाईलाजाने 30 जुलैला वंचित आपली विधानसभेच्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर करेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button