breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महापालिकेचे 43 कर्मचारी बेपत्ता?, निवडणुकीसाठी गेलेले पुन्हा परतलेच नाहीत

  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून कर्मचारी परतलेच नाहीत
  • ते कर्मचारी दरमहा घेतात महापालिकेचा लाखो रुपये पगार

विकास शिंदे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 43 कर्मचारी मागील पाच वर्षापासून निवडणुक विभागाचे कामकाज करीत आहेत. त्या सर्व कर्मचा-यांना महापालिकेकडून पगार दिला जात आहे. ते 43 कर्मचारी विधानसभा निवडणुकीकरिता गेले होते. त्यानंतर महापालिकेकडे कार्यमुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मागील पाच वर्षापासून हे कर्मचारी कोणतं काम करीत आहेत, ते कर्मचारी नेमकं आहेत कुठे? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानूसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शेकडो कर्मचारी नियुक्त केले होते. ते सर्व कर्मचारी पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा निवडणुक विभागाकडे नियुक्त केले होते. मात्र, 2014 मधील विधानसभा निवडणुक झाल्यानंंतर त्यातील काही कर्मचा-यांना कार्यमुक्त केले होते. परंतू, त्यातील अद्यापही 43 कर्मचारी मागील पाच वर्षापासून कार्यमुक्त केलेले नाहीत. त्या सर्व कर्मचा-यांना महापालिकेचा दरमहा लाखो रुपये पगार दिला जात आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या 43 कर्मचा-यांबाबत जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुक काळात त्या 43 कर्मचा-यांना कार्यमुक्त केलेले नाही. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात अपु-या मनुष्यबळामुळे अडथळा निर्माण होत आहे. दरमहा अनेक कर्मचारी सेवानियुक्त, स्वेच्छा निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्या कर्मचा-यांना निवडणुक कामकाजातून कार्यमुक्त करण्यात यावे, जेणेकरुन महापालिकेच्या विविध विभागातील कामकाजास थोडीफार मदत होईल, त्यावर अद्यापही खुलासा आलेला नाही. या कर्मचा-याबाबत महापालिकेच्या पदाधिका-यांनी सर्वसाधारण सभेत निर्णय घ्यावा, अशी विनंतीही प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button