breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसे आक्रमक! पाणीपुरवठा अधिकाऱ्याच्या बोर्डाला फासले काळे

पिंपरी – निगडी प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी स्थानिक नागरिकां समवेत पाणी पुरवठा विभागात धाव घेतली परंतु आपल्या दालनात उपस्थित नसणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात मनसेने आक्रमक होत आंदोलन केले.यावेळी अधिकाऱ्याच्या खुर्चीला,बोर्डाला काळे फासत घोषणाबाजी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रभाग क्र.13,से.क्र.22, निगडी-यमुनानगर विभागात पिण्याच्या पाण्या संदर्भातील अनेक तक्रारी देऊन देखील त्यावर कोणत्याही उपाययोजना न झाल्याने फ क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा अधिकारी शहाजी गायकवाड यांच्या दालनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले हे प्रभागातील नागरिकां समवेत गेले परंतू तेथे अधिकारी उपस्थित नसल्याचे चिखले यांचा पारा चढला. चिखले यांनी अधिकाऱ्याच्या खुर्चीला तसेच बोर्डाला काळे फासत मनसे स्टाईल खळ-खट्ट्याक आंदोलन केले. मनसेचे पदाधिकारी व नागरिकांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चिखले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेक आरोप केले.

प्रभागात वेळेवर पाणी सोडण्यात येत नाही. पाणी पुरवठा बाबत अनियमितता असून से.क्र. 22 या विभागातील पाणीपुरवठा करणेकामी नेमण्यात आलेले वॉल्व्हमन वेळेवर पाणी सोडत नाहीत. पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रिक मोटर अत्यंत जीर्ण स्वरूपाच्या झाल्या असल्याने त्या वारंवार बंद पडत आहेत.यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करणे पालिकेची जबाबदारी आहे. होणारे बिघाड तात्काळ दूर करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन तसेच संबंधित अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडविण्यात यावा, अन्यथा याहीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे. सदर आंदोलनाला राजु खाडे व प्रभागातील नागरीक उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button