breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभा निवडणूक : काँग्रेसकडून पिंपरीतून चार तर चिंचवडमधून तीन इच्छुकांच्या मुलाखती

पिंपरी, (महाईन्यूज) – आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. आज पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या काँग्रेसच्या वतीने मुलखती घेण्यात आल्या. पुण्यातील काँग्रेस भवन येथे या मुलाखती पार पडल्या.

काँग्रेसकडून विधानसभा मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. पिंपरी मतदार संघातील अर्ज केलेल्या मनोज कांबळे, गौतम आरकडे, सुंदर कांबळे, बाबा बनसोडे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर, चिंचवडमधून सचिन साठे, संदेश नवले, परशुराम गुंजाळ यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

काँग्रेसचे राजेश शर्मा, माजी खासदार जयंत आवळे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन माजी मंत्री जयंत आवळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button