breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिका विषय समिती सभापतींची निवडणूक बिनविरोध

  • सभापतीपदावर अश्विनी बोबडे, निर्मला कुटे, राजेंद्र लांडगे आणि तुषार हिंगे यांची वर्णी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समिती सभापतीपदी अश्विनी बोबडे, महिला व बालकल्याण समिती निर्मला कुटे, शहर सुधारणा समिती राजेंद्र लांडगे आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदी तुषार हिंगे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड करण्यात आली. 

महापालिकेच्या मधुकर पवळे सभागृहातील शुक्रवारी (दि. 14) रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.

महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एका सदस्यांची प्रत्येक विषय समितीत निवड करण्यात आलेली आहे. सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होणार हे निश्चित होते.

दरम्यान, सोमवारी (दि.10) भाजपने चारही विषय समिती सभापती पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button