breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात साडे सात हजार पोलीस बंदोबस्तावर तैनात

पुणे: गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट ओढवलेलं आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यंदा पुण्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यात तब्बल साडे सात हजारांवर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत.

गणेशोत्सवासाठी यंदा साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुमारे बारा हजार पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकांना परवानगी नसल्याने यावर्षी सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी आणि सातशे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी सज्ज होणार आहेत. आवश्यकतेनुसार, हा बंदोबस्त वाढविण्यात येईल, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button