breaking-newsTOP NewsUncategorizedमुंबई

व्हायरस दिवसा झोपतो आणि रात्री बाहेर पडतो का? जलील यांची सरकारवर टीका

  कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे ब्रिटन तसेच दक्षिण आफ्रिका देशामध्ये नवे संकट ओढवले आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने भारत – ब्रिटनमधील विमानसेवा तूर्त बंद करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने देखील परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईनचा निर्णय घेतानाच राज्यातील महापालिका हद्दीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आला आहे.

मात्र रात्रीच्या संचारबंदीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पुन्हा एकदा मुर्खपणाचा निर्णय घेतला असल्याचे म्हणत, त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

जलील यांनी ट्विट केले की, कोरोना व्हायरसनेने सरकारला सांगितले का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल ? पुन्हा एकदा मुर्खपणाचा निर्णय.

सोबतच, ख्रिसमसच्या निमित्ताने मध्यरात्रीनंतरही चर्च खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी देखील जलील यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button