breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

महाचक्रीवादळ अम्फन पश्चिम बंगालमध्ये धडकलं; वेगवान वाऱ्यासह पावसाचा तडाखा, दोन महिलांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान चंक्रीवादळानं आपलं रौद्ररुप दाखवणं सुरू केलं आहे. हे चक्रीवादळ बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं असून, कोलकाता आणि ओडिशामध्ये ताशी १३० किमी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडले असून, दक्षतेचा उपाय म्हणून चक्रीवादळाचा तडाखा बसणाऱ्या भागातील लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० कि.मी. आणि ओडिशातील पारादीपपासून ५२० कि.मी. अंतरावर बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं. केंद्रबिंदूपासून हे वादळ ताशी १४० कि.मी. वेगाने उत्तरपूर्वेकडे कूच करत होतं. बुधवारी सायंकाळी सात वाजता अम्फान महाचक्रीवादळ बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं. दरम्यान वादळ येण्यापूर्वीच ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला.

अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये शिरण्यापूर्वी बोलाताना हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहपात्रा म्हणाले, “महाचक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले, तेव्हा त्याचा वेग ताशी १६० ते १७० किमी इतका होता. वादळामुळे अनेक भागात तुफान पाऊस सुरू झाला. पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांना वादळी पावसानं झोडपलं आहे. उत्तर परगना आणि हावरा जिल्ह्यात झाडं कोसळल्यानं दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ४१ तुकडय़ा पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर लाखो लोकांना धोक्याच्या ठिकाणांहून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button