breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Makar Sankranti | हिवाळ्यात थंडी जास्त प्रमाणात असल्याने शरीरासाठी ऊर्जा जास्त लागते. अशावेळी पौष्टिक पदार्थ खाणे महत्वाचे मानले जाते. अशातच आज नवीन वर्षाचा पहिला संक्रांत हा सण आहे. या सणाला आपल्या देशात खूप महत्व आहे. हा सण थंडीत येत असल्याने या सणाला मोठ्या व्यक्तींने तीळ गूळ वाटण्याची प्रथा आहे. मात्र हे तीळ गूळ देण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

मजबूत हाडे : तिळाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. यासोबतच हे लाडू हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यासोबतच हिवाळ्यात सांधेदुखी, गुडघेदुखी सारख्या आजरांपासून सुटका करतात.

कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते : थंडीमध्ये हृदयाच्या समस्या जास्त प्रमाणात आढळतात. यामागचे कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात न राहणे. तिळाचे लाडू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कायम राहते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

हेही वाचा    –    सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; स्वत: दिलं स्पष्टीकरण, म्हणाला.. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते : तिळाचे लाडू रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास खूप मदत करतात. जर तुम्हाला संसर्ग आणि रोगांपासून सुरक्षित राहायचे असेल,तर तुम्ही हिवाळ्यात तिळ गुळाचे लाडू खाणे महत्वाचे मानले जाते.

दाहक-विरोधी गुणधर्म : तिळाच्या लाडूमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. मुतखडा आजार असलेल्या लोकांसाठी तीळ गुळाचे लाडू उपयुक्त ठरतात. कारण त्यांना जळजळ होण्याची अधिक शक्यता असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button