breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महागाईचा भडका ! पेट्रोल 13, तर डिझेल 11 पैशांनी महागलं

मुंबई : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आज पुन्हा इंधनांच्या दरवाढीचा चटका सर्वसामान्यांना सहन लागणार आहे.  मुंबईमध्ये पेट्रोल 13 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागलं आहे.  परिणामी, मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना 88.39 रुपये मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी 77.58 रुपये माजावे लागणार आहेत.

दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर 13 आणि डिझेलचे दर 11 पैशांनी वधारले आहेत.  पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button