breaking-newsताज्या घडामोडी

रेल्वेत कोणत्या वयोगटातील मुले करू शकतात मोफत प्रवास, जाणून घ्या नियम

Indian Railways Ticket Rules | भारतात सर्वाधिक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. मात्र अनेक वेळा जेव्हा लोक आपल्या मुलांना सोबत घेऊन जातात, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न असतो की, कोणत्या वयापर्यंत मुलांना मोफत रेल्वे प्रवास करता येतो? याचबद्दल रेल्वेचे काय आहेत नियम, ते जाणून घेऊ…

पहिला नियम : भारतीय रेल्वेने प्रत्येक गोष्टीबाबत नियम बनवले आहेत. त्यातील एक म्हणजे मुलांसाठी मोफत तिकीट. नियमानुसार एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांना रेल्वेने मोफत प्रवास करता येतो.

दुसरा नियम : रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखाद्या मुलाचे वय ५ ते १२ वर्षे दरम्यान असेल आणि अशा मुलाला रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर या वयोगटातील मुलांसाठी तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मुलासाठी रेल्वेत आरक्षित सीट नको असेल तर तुम्ही अर्धे तिकीट खरेदी करू शकता.

हेही वाचा     –      माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एम. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर 

तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की, ५-१२ वर्षे वयोगटातील मुलांची हाफ तिकीट काढल्याने त्यांना बसायला वेगळी सीट मिळत नाही. त्यांना प्रवासादरम्यान आपल्या पालकांसोबत बसावे लागते.

तसेच जर तुमच्या मुलाचे वय ५-१२ वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी बर्थ बुक करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या मुलासाठी पूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल आणि त्यासाठी पूर्ण भाडे द्यावे लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button