breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PIMPRI : महापौर शिष्टमंडळाची दिल्लीत भरली “शाळा”, आम आदमीचे पदाधिका-यांना धडे

पिंपरी (महा ई न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवकांनी दिल्लीतील गोल मार्केटमधील “एन. पी. बंगाली गर्ल्स सिनिअर सेकंडरी स्कूल”ला आज सोमवारी (दि. 8) भेट दिली. तेथील अभ्यासक्रमाची पध्दत, शिकविण्याची पध्दत, उपकरणे, टॅब, वायफाय सुविधा आदी बाबींची माहिती घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापनासोबत अभ्यासक्रमाच्या बाबतीत पदाधिका-यांनी चर्चा केली.

शाळेतील कॉन्फरन्स हॉलमधील बैठक व्यवस्था, मुलांची टॅब रूम, 40 टॅब ठेवण्याची व्यवस्था, स्मार्ट क्लास रूम, प्रत्येक क्लास रुममध्ये दोन बोर्ड एक स्मार्ट आणि दुसरा साध्या फळ्यांची व्यवस्था. आदी गोष्टी पदाधिका-यांनी या शाळेत पाहिल्या. सध्या शाळेच्या इमारतीची रचना, सुविधा, क्रीडा मैदान याची पदाधिकारी पाहणी करत आहेत. नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. मात्र, त्याठिकाणच्या तीनही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे तेथील भाजप पदाधिका-यांनी केंद्र सरकारच्या नाविण्यपूर्ण योजनांतर्गत या शाळेचा विकास साधला आहे.

या शिष्टमंडळात महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष अघाडी गटनेते कैलास बारणे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, नगरसेवक प्रमोद कुटे, शाम लांडे, नवनाथ जगताप, संदीप कस्पटे, सहायक आयुक्त निळकंठ पोमण, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे आदींचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button