breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूज’ कार्यालय : राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांना आरतीचा मान!

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील ”महाईन्यज”च्या कार्यालयातील पर्यावरणपूरक गणपतीची आरती करण्याचा आजचा मान राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांना देण्यात आला. आज सकाळी साडेअकरा वाजता गव्हाणे यांच्या शुभहस्ते गणरायांची भक्तीभावाने आरती करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ”महाईन्यूज”ने घेतला. त्यानुसार तुरटीपासून बनविलेली पर्यावरणपूरक गणेश मुर्ती कार्यालयात बसविली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांना गणरायांची आरती करण्याचा मान दिला जाणार आहे. आज आरती करण्याचा मान राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे यांना देण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजता गव्हाणे यांच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष उमेश काटे, उपाध्यक्ष विनोद भांगे, भोसरी विधानसभा अध्यक्ष नारायण पाटील आदी उपस्थित होते.

बुध्दीची देवता असलेल्या बाप्पांच्या मुर्तीला गव्हाणे यांनी कुंकम तिलक लावून पुष्पहार घातला. कर्पूर, धूप, अगरबत्तीचा दरवळ आणि सुवासिक वातावरणात प्रासादिक मोदक ठेवण्यात आले. सर्वांनी गणरायांना फुले अर्पण करून आरती घेतली. प्रसादाचा आस्वादही सर्वांनी घेतला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष गव्हाणे आणि ”महाईन्यूज”च्या प्रतिनिधींमध्ये काही महत्वाच्या गप्पा रंगल्या. ”महाईन्यूज”च्या कार्यालयातील प्रत्यक्ष कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. व्यक्तीपरत्वे कामाची जबाबदारी आणि त्यांच्यातील कौशल्याची त्यांनी माहिती घेतली.

कोरोनाच्या काळामध्ये ”महाईन्यूज”चे चाललेले कामकाजही त्यांनी जाणून घेतले. संपादक, पत्रकार, निवेदिका, डिजिटल मॅनेजर, कॅमेरामन, ग्राफीक डिझायनर यांच्यावरील जबाबदारी त्यांना सांगण्यात आली. वेब न्यूज पोर्टल (www.mahaenews.com), फेसबुक पेज (Mahaenews), यू ट्यूब (mahaenews.com) याची माहिती त्यांनी घेतली. सडेतोड लेखन शैली आणि निपक्ष लेखनीच्या जोरावर अल्पावधीत वाचकांच्या मनात स्थान निर्माण केल्याने गव्हाणे यांनी संपूर्ण स्टाफचे कौतुक केले. तसेच, काही महत्वाच्या सूचना देखील त्यांनी केल्या.

सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्याने महाईन्यूजच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पक्षसंघटन आणि कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यासाठी बुधवारपासून (दि. 26) त्यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये जाऊन विद्यार्थी संघटनेतील पदाधिका-यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या कामाचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी आवश्यक त्याठिकाणी नवीन पदाधिका-यांची निवड केली जाणार आहे. पक्षाचे मनापासून काम करणा-या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button