breaking-newsटेक -तंत्र

लाँच आधीच Moto G9 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत उघड

नवी दिल्लीः मोटोरोलाने गेल्या काही आठवड्या आधी भारतात आपला वन फ्यूज़न+ मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने गेल्या वेळी मोटो जी सीरीजचे नवीन हँडसेट टीज करीत आहे. हँडसेटला आज दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. परंतु, लाँच आधीच फ्लिपकार्टवर हँडसेटचे सर्व वैशिष्ट्ये आणि किंमतीची माहिती उघड झाली आहे.

फ्लिपकार्टवर मोटो जी ९ साठी बनवण्यात आलेल्या मायक्रो साइटवर हँडसेटचा फोटो आणि त्याची खास वैशिष्ट्ये लिस्ट करण्यात आली आहे. परंतु, आता हे हटवण्यात आले आहे. या फोनध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. यात आस्पेक्ट रेशियो 20:9 असणार आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ मोबाइल प्लॅटफॉर्म आहे ४ जीबी रॅम प्लस आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकते. हँडसेटमध्ये वॉट रिपॅलेंट डिझाईन देण्यात आली आहे. कॅमेरा मॉड्यूल च्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, मायक्रो आणि डेप्थ सेन्सर दिले आहे. स्मार्टफोनमध्ये कॅमेरा नाइट व्हिजन मोड सपोर्ट दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात २० वॉट टर्बोपॉवर चार्जिंग सोबत 5000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्यूल ४ जी व्हीओएलटीई, वाय फाय एनएफसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि ग्लोनास यासारखे फीचर्स दिले आहेत.

फ्लिपकार्टवरून ही माहिती उघड झाली आहे की, मोटोरोला मोटो जी ९ ला ११ हजार ४९९ रुपयांत किंमतीत लाँच करण्यात येणार आहे. याची विक्री ३१ ऑगस्टपासून दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. परंतु, हँडसेटची खरी किंमत लाँच करण्यात आल्यानंतर स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button