breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोल्हापूर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही – सतेज पाटील

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकीनंतर एकत्रही येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.

वाचा :-मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरू, क्रांती मोर्चा आक्रमक

कोल्हापूर महापालिका प्रस्ताविक आहे. मागील वर्षी महानगरपालिका निवडणुकीत विविध पक्षांमध्ये चुरस होती. स्वतंत्र निवडणूक लढणार असं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जाहीर केलं आहे. काँग्रेसही स्वतंत्र निवडणूक लढवेल, आम्ही आमचा निर्णय वरिष्ठांना कळवणार आहे. महाविकास आघाडी नक्की महापालिकेवर सत्ता स्थापन करेल, असं सतेज पाटील म्हणाले आहेत. महापालिका निवडणूक काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button