breaking-newsराष्ट्रिय

मल्याच्या बँक खात्यांची माहिती स्विस सरकार भारताला देणार

भारतीय बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्या याच्या स्विस बँकांमधील खात्यांची आणि तीन कंपन्यांची माहिती सीबीआय या भारतीय तपास यंत्रणेला देण्याचा निर्णय स्वित्झलँड सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयाविरोधात मल्याने स्वित्झलँडच्या सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती, मात्र या खटल्यात न्यायालयाने स्विस सरकारच्या बाजूने कौल दिला. ऑगस्ट २०१८ मध्ये स्विस बँकेने मल्याच्या विविध ठेवी गोठवल्या होत्या.

भारतातील विविध बँकांचे ९००० कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्या २०१६ साली लंडनला पळून गेला होता. काही दिवसांपूर्वी लंडनच्या उच्च न्यायालयाने मल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता. दरम्यान ऑगस्ट २०१८ मध्ये स्विस बँकेने मल्याच्या विविध बँकांतील ठेवी गोठवल्या. त्यानंतर त्याच्या खात्यांची माहिती भारत सरकारला देण्याचा निर्णयही तेथील सरकारने घेतला. या निकालाला विरोध करत मल्याने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती.  मल्याचे प्रकरण सध्या सीबीआय हाताळते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button