breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मराठी चित्रपटांच्या तिकिटांवरील जीएसटी रद्द करावा; अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मागणी

पुणे | महाईन्यूज

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने चित्रपट व्यावसायिकांचे संमेलन व्हावे, तसेच मराठी चित्रपटांच्या तिकिटांवरील जीएसटी रद्द करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना दिले.

महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी व्यावसायिक संमेलनापासून ते मराठी चित्रपटांवरील जीएसटीपर्यंत विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची दखल घेऊन त्याची पूर्तता करण्यात येईल तसेच पुण्यात होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपट व्यावसायिक संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासनही पवार यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button