breaking-news

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले, एकावर गुन्हा

सोलापूर|महाईन्यूज|

सोशल मीडियावर अनेकाचे सुत जूळले सांगितले जातात. पण काहींनी चुकीचा वापर केल्याने जमलेले लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्याने एका 21 वर्षीय तरुणीचे स्वत:सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे तिचे दोनवेळा जमलेले लग्न मोडले. या प्रकारामुळे एका तरुणाच्या विरोधात टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली, सापटणे (टें) येथील 21 वर्षीय तरुणी ही तिच्या मैत्रिणीबरोबर  शिवण क्लाससाठी जात होती. पुढे कधी कधी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊ लागली. यामुळे मैत्रिणीच्या भावाशी ओळख झाली. त्यानंतर एकेदिवशी ती तिची मैत्रीण, तिचा भाऊ अविनाश सुळे व भावजय हे सर्वजण भीमानगर येथील उजनी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अविनाश याने त्याच्याकडील मोबाईलमध्ये त्या तरुणीस फसवून तिच्याबरोबर सेल्फी फोटो काढले होते.

फेब्रुवारी 2019 मध्ये या तरुणीस पाहण्यासाठी बाभूळगाव येथील पाहुणे आले होते. ही माहिती सुळे यास समजताच त्याने त्या पाहुण्यांना तिच्याबरोबर काढलेले फोटो दाखवून लग्न मोडले होते. त्यानंतर पुन्हा मंगळवेढा तालुक्यातील तरुणाशी जमलेले लग्नही अविनाश सुळे याने त्या फोटोमध्ये फेरफार करून, त्या पाहुण्यांना जाऊन दाखविले. तसेच त्या मुलीच्या नातेवाईकांकडे सोशल मीडियाद्वारे पाठवले.

या फोटोचा गैरवापर करून, तरुणीच्या परवानगीशिवाय तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून दोनवेळा जमलेले लग्न मोडण्यास कारणीभूत ठरल्याने तरुणीच्या फिर्यादीवरून अविनाश सुळे याच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button