breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Jio च्या टक्कर मध्ये स्वस्त 4जी स्मार्टफोन घेवून येतेय Airtel

नवी दिल्ली – रिलायन्स जिओप्रमाणे आता भारती एअरटेल स्वस्त ४ जी स्मार्टफोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. यासाठी एअरटेल लवकरच स्मार्टफोन कंपन्यासोबत पार्टनरशीप करू शकते. एका ताज्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. रिलायन्स जिओ अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा स्वस्त ४ जी लाँच करू शकते. त्यामुळे एअरटेल सुद्धा पार्टनरशीपसाठी स्थानिक ब्रँड्सच्या शोधात आहे.

लॉक्ड आणि अनलॉक्ड असतील डिव्हाईस
टेलिकॉम टॉक रिपोर्टच्या माहितीनुसार, एअरटेल भारताच्या स्थानिक ब्रँड्ससोबत मिळून लॉक्ड आणि अनलॉक्ड दोन्ही बाजुनी स्मार्टफोन घेवून येण्याची शक्यता आहे. भारतात लॉक्ड डिव्हाइस मध्ये खूप जास्त चलन नाही. तर यूएस आणि अन्य दुसऱ्या वेस्टर्न मार्केटमध्ये टेलिकॉम ऑपरेटर्स स्मार्टफोन कंपन्याच्या सोबत मिळून असे फोन्स घेऊन येण्याची शक्यता आहे. टॅरिफ प्लान किंवा मंथली पेमेंट ऑप्शन सोबत येते. आता भारती एअरटेल सुद्धा असा फोन्स आणू शकते.

जिओ लावू शकते २जी युजर्समध्ये भेद
रिलायन्स जिओ केवळ एलटीई आधारित कंपनी आहे. तर एअरटेल आणि वोडाफोन आयडिया GSM ऑपरेटर्स आहे. त्यामुळे गुगल सोबत मिळून स्वस्त ४ जी स्मार्टफोन लाँच करून रिलायन्स जिओ बाकीच्या दोन्ही कंपन्याच्या २ जी युजर्संना आपल्याकडे खेचू शकते. हेच कारण आहे की, एअरटेल अशी परिस्थितीत वाचण्याची तयारीला लागली आहे.

याआधी एअरटेलने प्रयत्न केला आहे
एअरटेल याआधीही प्रयत्न केलेला आहे. कंपनीने स्थानिक ब्रँड Celkon सोबत पार्टनरशीप करून माझा पहिला स्मार्टफोन प्रोग्रामची सुरूवात केली होती. या अंतर्गत एअरटेल स्वस्त किंमतीत स्मार्टफोन ऑफर करीत होती. यानंतर त्याला अॅक्टिव ठेवण्यासाटी मंथली रिचार्ज करावे लागत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button