breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठवाडा ट्रस्टतर्फे वृक्ष संवर्धनाचे विधायक पाऊल

अध्यक्ष अरुण पवार यांचा पुढाकार

पिंपरी (महा-ई-न्यूज) – पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली वृक्षारोपणाचा धडाका लावणारे वृक्षाच्या संवर्धनाचा विचार करत नाहीत. केवळ प्रसिध्दी मिळविण्यासाठी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून वृक्षारोपणाचा देखावा केला जातो. यात लावलेली झाडे जळून जातात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा उद्देश सफल होत नसल्याची खंत मनालावर घाव घालून गेल्याने पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी झाडांच्या संवर्धनासाठी कष्ट उपसण्याची तयारी ठेवली आहे. पवार यांच्या माध्यमातून केवळ झाडे लावली जात नाहीत, तर त्याचे संगोपण देखील केले जाते.

 

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या सात वर्षापासून प्रतिवर्षी किमान एक हजार वृक्षांची लागवड केली जाते. एवढेच नाही, तर ही रोपटी जगली पाहिजेत, म्हणून रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी ट्रस्टमार्फत घेतली जाते. जास्तीत जास्त वृक्षाची जाळीसह लागवड केली जाते. तसेच वृक्षांना गरजेनुसार टॅकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. सन 2012 पासून आठवड्याच्या दर रविवारी वृक्ष संवर्धनासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबिवले जात आहेत.

 

उस्मानाबाद जिल्यातील धारूर, चिंचोली, बिंजनवाडी सोनारी, निजाम जावळा येथे जाळीसह वृक्षलागवड करण्यात आली. तसेच पिंपळे गुरव, मरकळ गाव, भंडारा डोंगर येथेही वृक्षांची लागवड करण्यात आली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे मागिल महिण्यात पाचशे रोपांची लागवड करण्यात आली. ही रोपे स्वयंभू होईपर्यंत ट्रस्टमार्फत त्यांची निगा राखण्यात येत आहे. या रोपांना नुकताच बाम्बूच्या काट्यांचा आधार देण्यात आला आहे. जेणेकरून जोरदार वार्‍यामुळे रोपे वाकून त्यांचे नुकसान टळण्यास मदत होईल. यासाठी स्वत: अरूण पवार, भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे हे वृक्षलागवड केलेल्या ठिकाणी लक्ष देत असतात.

 

वृक्षारोपन केलेली रोपे पाण्याअभावी नष्ट होऊ नयेत, यासाठी मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टकडे मागणी केल्यास या रोपांना पिंपरी-चिंचवड शहरात कोठेही टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जाईल. वृक्षांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने मोफत पाणीपुरवठ्यासाठी पिंपळे गुरव येथील ट्रस्टशी संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button