breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पवना धरणातील पाण्याचे महापाैरांच्या हस्ते पूजन

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षभर शहरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पवना धरणाची पाहणी आज (मंगळवारी) महापाैर राहूल जाधव यांनी केली. त्यावेळी पवना धरणातील पाण्याचे जलपुजन त्याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे आयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, विशाल कांबळे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मनोहर खाडे उपस्थित होते. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे.  पवना धरण शंभर टक्के भरल्याने पिंपरी चिंचवड शहराच्या पिण्याच्या पाण्यासह मावळातील शेतीच्या पाणी प्रश्न मिटला आहे. सध्यस्थितीत  पवना धरणातील उपयुक्त जलसाठा 9.60 टीएमसी आहे. पवना धरण परिसरात एक जूनपासून दोन हजार3180 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button