breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रातील तुरूगांमध्ये 2,011 कैदी आणि 416 कारागृतील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; तर, 6 कैदी आणि 4 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रसार हा सर्वसामान्यांपर्यंत पोहचला आहे त्याप्रमाणे तो महाराष्ट्रातील तुरूगांमध्येही पोहचला आहे. आता पर्यंत महाराष्ट्रातील तुरूगांमध्ये 2,011 कैदी आणि 416 कारागृतील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे 6 कैदी आणि 4 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्य कारागृह विभागाने माहिती दिली आहे.
दरम्यान, राज्यात शनिवारी 434 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. आतापर्यंत राज्यातील 21235 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याशिवाय 208 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापूर्वी येरवडा कारागृहातून 5 कोरोना पॉझिटिव्ह कैदी फरार झाले होते. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.