breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

चॉकलेट डे का साजरा करतात? या दिवसाचे महत्त्व काय? वाचा सविस्तर..

Chocolate Day | सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक सुरू असून या आठवड्यात लोक त्यांच्या जोडीदारांना आणि प्रियजनांनाबद्दल अधिक खास फील करतात. आज व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे, जो चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना चॉकलेट गिफ्ट देतात.

चॉकलेट ही अशी गोष्ट आहे की ती खायला सगळ्यांनाच आवडते. काही काळ प्रेमळ जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन आपले प्रेम व्यक्त करत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? का साजरा केला जातो हा दिवस या दिवसाचे नक्की महत्त्व काय? ते आपण जाणून घेऊया..

हेही वाचा   –    माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; अजित पवार म्हणाले..

चॉकलेट डे का साजरा केला पाहिजे?

चॉकलेट डे व्हॅलेंटाइन वीकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवसाचे कारण खूप खास आहे. असे मानले जाते की चॉकलेट खाल्ल्याने लव्ह लाईफ चांगली जाते.

चॉकलेटमध्ये असलेले थिओब्रोमाइन आणि कॅफीन मेंदूमध्ये एंडोर्फिन सोडतात, ज्यामुळे शरीरात बरेच बदल होतात. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते.

दरम्यान, चॉकलेट डेची क्रेझ सध्याच्या काळात तरुण जोडप्यांमध्ये खूप पाहायला मिळते. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची आपली वेगळी पद्धत असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button