breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पडळकर वाद आणखी पेटला, राष्ट्रवादीच्या या नेत्याला शिवीगाळ आणि धमकी

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला तर भाजपनेही पडळकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलंय. या वादात आता आणखी एक नवा वाद पेटला आहे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांना पडळकर समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी उमेश पाटील यांनी मोहोळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उमेश पाटील हे सोलापूर झेडपी सदस्य आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पाटील यांनी प्रसारित केलेल्या एका व्हिडीओवरून गोपिचंद पडळकर विरूद्धच्या तिखट प्रतिक्रियेमुळे, गोपिचंद पडळकर आणि त्यांचे समर्थक पाटील यांना धमकीचे फोन करत असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

उमेश पाटील म्हणतात ?

‘मला फोन करून शिवीगाळ करतात. जीवे मारण्याची धमकी देतात आणि माझ्यासह साहेबांना, दादांना व सुप्रिया ताईंना खूप खालच्या स्तरावर जाऊन आर्वाच्य व घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात. आतापर्यंत मला या स्वरूपाचे धमकीचे ३/४ फोन आले. पण मी कोणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button