breaking-newsआंतरराष्टीय

न्यूझीलंडमधील गोळीबारात सात भारतीयांचा मृत्यू

न्यूझीलंडमध्ये मशिदींवरील दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सात भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये हैदराबादमधील एक, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. अन्य तीन जण भारतीय वंशाचे आहेत. त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलगंनातील असल्याचे समजतेय. या गोळीबारात पाकिस्तान आणि बांगलादेशमधील दोन-दोन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील मशिदींमध्ये गोळीबारातील मृत्यूचा आकडा ५० वर गेला आहे. तर एकूण ४८ जण जखमी आहेत. या ५० निष्पापांचे बळी घेणारा दहशतवादी ब्रेन्टॉन हॅरीसन टॅरॅन्टला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हैदराबादच्या राहणाऱ्या फरहाज हसन आणि मुसा वली सुलेमान पटेल यांचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. फरहाज हे सात वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये काम करत होते. ते व्यवसायाने अभियंता होते. मुसा वली पटेल यांचे भाऊ हाजी अली पटेल यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील राहणाऱ्या २५ वर्षीय अंशी अलीबावा या महिलेचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. अंशी आपल्या पतीबरोबर मशिदीत गेली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली.

या हल्ल्यात गुजरातमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात पिता-पुत्रांनाही आपला जीव गमावावा लागला आहे. यामध्ये भारुचमधील एनआरआय, नवसारीमधील एका व्यक्तीसह वडोदराच्या पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. वडोदरामधील आरिफ वोहरा आणि त्यांचा पुत्र रमीज वोहरा मशिदींवरील दहशतवादी हल्ल्यानंतर बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी, त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय नवसारीमधील जुनेद युसुफ कारा आणि भरुचमधील हाफेज मूसा वली यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

न्यूझीलंडमधी मशिदींवरी हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय उच्चायुक्तालयाकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने भारतीय बेपत्ता असलेल्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यूझीलंडमध्ये २ लाखांहून अधिक भारतीय वंशांचे नागरिक राहतात. यापैकी ३० हजार विद्यार्थी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button