breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

IAS विजय शंकर सापडले मृतावस्थेत, आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

बंगळुरु| IAS अधिकारी बी एम विजय शंकर हे काल (मंगळवार) रात्री बंगळुरु येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. सीबीआय आयएमए पोंजी घोटाळ्याप्रकरणी शंकर यांच्याविरुद्ध खटला चालविणार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरु शहर जिल्ह्याचे माजी उपायुक्त शंकर हे येथील जयनगर येथील त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळून आले.

पोलिसांनी याबाबत अद्याप तरी फार माहिती दिलेली नाही. याविषयी बोलताना ते एवढंच म्हणाले की, ‘हे खरं आहे की, ते त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळून आले आहेत.’ विजय शंकर यांच्यावर आयएमए पोंजी घोटाळा झाकण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात युती सरकारने २०१९ मध्ये एक विशेष तपास पथक तयार केले होते, ज्याने शंकर यांना अटक केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button