breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई विमानतळावर केनियन महिलांकडून २ कोटींचे तब्बल ४ किलो सोने हस्तगत

मुंबई | प्रतिनिधी
 मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शारजाहून आलेल्या १८ केनियन महिलांच्या गटाकडून कॉफी पावडरच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवलेले ३.८० किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत २ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. या महिलांकडून काही वैयक्तिक वस्तू जप्त केल्या आहेत. या सर्व महिलांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. यातील एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सोने जप्त करण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी विमानतळावर १८ केनियन महिलांची तपासणी केली. प्रत्यक्षात कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर केलेल्या तपासणीदरम्यान बार, वायर आणि पावडरच्या स्वरूपात दोन सापडले आहे. कॉफी पावडरच्या बाटल्या, आतल्या कपड्यांचे अस्तर, पादत्राणे आणि मसाल्याच्या बाटल्यांमध्ये हे सोने लपवले होते. याठिकाणी एकूण ३.८० किलो सोने जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २ कोटींच्या घरात आहे. एका केनियन महिलेला मोठ्या प्रमाणात सोने घेऊन जात असल्याने अटक करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button