breaking-newsमहाराष्ट्र

‘मनुस्मृती’ जाळणे समानतेसाठी महत्त्वाचे

  • छगन भुजबळ यांचे मत; काम करण्यासाठी सत्ता महत्त्वाची

‘मनुस्मृती’त महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. ब्राह्मण समाजातील महिलाही शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. या समाजातील केवळ पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता. इतर कुणी शिक्षणाविषयी काही ऐकत असल्यास त्यांनाही कडक शासन होते. या सर्वाचा उल्लेख ‘मनुस्मृती’त करण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ जाळली. देशात समानता प्रस्थापित करण्यासाठी हे कार्य फार महत्त्वाचे होते, असे ठाम मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी माळी समाज संमेलनात व्यक्त केले.

अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते डी. के माळी यांच्या सहस्रचंद्र सोहळ्याच्या निमित्ताने माळी समाजाच्या संमेलनाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री स्वामिप्रसाद मौर्य यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भुजबळ यांच्या हस्ते डी. के. माळी व त्यांच्या पत्नी प्रमिला माळी यांचा सत्कार करण्यात आला.

माळी समाजाने केवळ संमेलन भरवून चालणार नाही. संघटन करून चालणार नाही. समाजात उत्कृष्ट काम करण्यासाठी सत्ता महत्त्वाची असते, असे भुजबळ म्हणाले. आपल्याच समाजातील काही नागरिक फुटीरता आणत असतात. मनुवादी शक्तींना हरविण्यासाठी ते शर्यतीत सहभागी होऊ शकत नसल्याने समाज तोडण्याचे काम समाजातील काही बांधवच करत असल्याचा आरोप त्यांनी केला. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊनच आम्ही कार्य करत आहोत. त्यांचे नाव घेऊन कार्य करताना आम्हीही भोगले आहे, असे त्यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र सदनात भ्रष्टाचार नाही’

महाराष्ट्र सदनासाठी सरकारने आतापर्यंत एक रुपयाही खर्च केलेला नाही आणि सरकारने पैसा दिलाच नाही तर भ्रष्टाचार होईलच कसा, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. महाराष्ट्र सदनात ८५० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले जात असले तरी मला एकही पैसा मिळालेला नाही. त्यामुळे मी भ्रष्टाचार कसा करेन? हीच गोष्ट मला अटक करणाऱ्यांच्याही लक्षात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button