breaking-news

#CoronaVirus: मेयोत सात नवीन संशयित

  • आतापर्यंत एकूण ८० संशयितांची नोंद; तिघांचा अहवाल सकारात्मक आल्याने यंत्रणा सतर्क

नागपूर | महाईन्यूज

मेयोत दाखल असलेल्या करोनाग्रस्ताच्या पत्नीला आणि त्याच्या सहकार्यालाही करोना विषाणूचा संसर्ग असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाल्यानंतर आज शुक्रवारी दिवसभरात मेडिकलमध्ये चार तर मेयोत तीन संशयितांना दाखल करण्यात आले. आतापर्यंत एकूण ८० संशयितांची नोंद करण्यात आली असून यातील २८ संशयित रुग्णालयात दाखल आहेत.

आतापर्यंत ३९ नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच ३१ संशयितांचा १४ दिवसांचा पाठपुरवठा पूर्ण झाला आहे. सध्या ४९ रुग्णांचा पाठपुरवठा सुरू आहे. मेडिकलमध्ये दाखल झालेले चारही संशयित अनुक्रमे ३६,४३,५३,३४ वर्षांचे असून ते देखील करोनाग्रस्ताच्या कंपनीतीलच कर्मचारी आहेत. सगळ्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या मेयोतील केंद्रात पाठवण्यात आले आहेत. करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वसामन्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button