breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसीलदार मॅडम हिरॉइनसारख्या दिसतात, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली

जालना | महाईन्यूज

माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बबनराव लोणीकरमहिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी परतूरमध्ये शेतकरी मोर्चा काढण्यासाठी बबनराव लोणीकर मार्गदर्शन करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ” शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अनुदान हवे असेल, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा मराठवाड्यातील परतूनहून निघाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना कार्यकर्ते जमवून आणले पाहिजेत. तुम्ही मला मोर्चासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा, सुधीरभाऊ यांना घेऊन येण्यास सांगा, मी आणतो. प्रसंगी गर्दी जमवण्यासाठी एखाद्या हिरॉइन बोलावू, हिरॉइन नाही मिळाली तर आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच की.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button