breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटक : जेठमलानींनीही घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली – कर्नाटकमधील राजकीय घडामोडींवरून वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनीही आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देण्याच्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. राज्यपालांचा निर्णय म्हणजे घटनात्मक अधिकाराचा दुरूपयोग असल्याची भूमिका जेठमलानी यांनी घेतली आहे.

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या कॉंग्रेस आणि जेडीएस या पक्षांच्या याचिकांवर उद्या (शुक्रवार) न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी जेठमलानी यांच्या याचिकेवरही विचार होणार असल्याचे समजते. कुठल्या पक्षाच्या बाजूने किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात न्यायालयात आलेलो नाही. मात्र, राज्यपालांच्या घटनाबाह्य निर्णयामुळे मी व्यथित झालो आहे, असे जेठमलानी यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button