breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सावधान! ‘हे’ आहेत पुण्यातील कोरोनाचे 5 नवे हॉटस्पॉट

पुणे |महाईन्यूज|

कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत चालला आहे. कोरोनाचा धोका दिवसागणित वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. हे 5 वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, सिंहगड रोड, वार्जे-कर्वेनगर, धनकवडी-सहकारनगर, हडपसर-मुढवा, अहमदनगर रोड-वडगाव शेरी या भागांचा त्यामध्ये समावेश आहे.

पुण्यात आज नव्यानं 1 हजार 621 लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खऴबळ उडाली आहे. आतापर्यंत पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 951 इतका झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पुणेकरांना एकीकडे यश मिळताना दिसत असलं तरी आता पुण्यातील या 5 भागांमध्ये नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे 41 लोकांचा बळी गेल्यामुळे मृतांचा आकडा 3,296 वर पोहोचला आहे. दिवसभरात एकूण 1,256 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि सक्रिय रुग्णांची संख्या 17,773 वर पोहोचली. पुण्यात एक दिवसात जवळपास 6 हजार 142 लोकांचे नमुने घेण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 6 लाख 01 हजार 091 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button