breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

अजित पवारांसोबत गेलेले तीन आमदार परतले!

मुंबई | एकीकडे 27 आमदार अजित पवार यांच्या पाठिशी असल्याचा दावा भाजपने केला असतानाच, त्यांच्यासोबत गेलेले तीन आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. अनिल पाटील आणि दौलत दरोडा दिल्लीहून मुंबईत परतले आहेत. तर नरहरी झिरवळही दिल्लीहून निघाले आहेत. त्यांचा मुक्काम देखील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्येच असेल.

आता राष्ट्रवादीचे केवळ दोन आमदारच संपर्कात नाहीत. एक म्हणजे खुद्द अजित पवार आणि दुसरे पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे.अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना हे आमदार त्यांच्यासोबत राजभवनात उपस्थित होते. शपथविधीनंतर हे तिन्ही आमदार दिल्लीला गेले होते. “आम्हाला वाटलं की पवार साहेबांचा पाठिंबा असेल म्हणून आम्ही गेलो होतो. दादा आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांचा आदेश आम्ही पाळला. पण आता आम्ही परत आलो आहोत. आम्ही पवारांसोबत आहोत. कुठेही काही गैरसमज नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button