breaking-newsमहाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ वापरणार

कोल्हापूर –  ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच ते मिळाले की नाही हे दर्शवणार्‍या ‘व्हीव्हीपॅट’ मशिनचा यावर्षी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच वापर केला जाणार आहे. याकरिता सोमवारी जिल्ह्यात 4 हजार 257 मशिन दाखल झाली. बंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स् लिमिटेड या कंपनीकडून ही मशिन घेण्यात आली असून, केर्ली (ता.करवीर) येथील जिल्हा प्रशासनाच्या गोदामात ती सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. मतदार याद्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. यासह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करण्यात येत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच ‘व्हीव्हीपॅट’ मशिनचा वापर केला जाणार आहे.

पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाने बंगळूर येथून चार कंटेनरद्वारे ही मशिन कोल्हापुरात आणली. सोमवारी सकाळी ती बंदोबस्तात केर्ली येथील गोदामात ठेवण्यात आली.

यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, तहसीलदार सुचित्रा आमले, नायब तहसीलदार शोभा कोळी, अर्चना गुळवणी आदींसह निवडणूक विभागाचे कर्मचारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button